Wednesday, September 18, 2013

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!!!

Ganpati Bappa Morya Pudhchya Varshi Lavkar Ya... 
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या !!!!

तू निघालास पुन्हा परतीच्या वाटेवर
तुझ्या निरोपाचा धुडगूस वाटा-वाटांवर
यंदा मंगलमय वाटलं नाही तुझ्या आगमनानं
हात जोडले गेले नाहीत तुझ्या वास्तव्यानं
तुझ्या दरबारात निघाले अब्रुचे धिंडवडे
तुझ्या डोळ्यांसमोर झाले संस्कारांवर बलात्कार
तुझ्या उत्सवाचा झालाय बाजार
सगळीकडे माजलाय नुसताच व्यभिचार
तरीही तुला निरोप देताना
सालाबादप्रमाणे पापण्यांच्या कडा ओलावतात
तू पुन्हा ये, पुढच्या वर्षी ये
आणि या माणसांना माणुसकीनं वागण्याची बुद्धी दे...


No comments:

Post a Comment