Friday, September 04, 2015

काळ चक्र


कितीही आपटा, इथच फेडायचं आहे
मित्रानो तुमच जर कोणी वाईट केले असेल आणि तुमी त्याच काहीच करू शकत नाही ? काळजी नका करू निसर्गाच्या नियमावर विश्वास ठेवा.
तो नियम म्हणजे “सर्कल कंपलिट होता हे”.
हा नियम एक उत्तम उदाहरण देऊन सांगतो … ऐका …
काय असते एक असतो उद्योगपती, सकाळी घाई गडबडीत तो घराच्या बाहेर निघतो गाडीचे दार उघडतो आणि दार उघडता उघडता गाडीखाली एक कुत्र बसलेलं असत त्याच्या पायावर याचा पाय पडतो, आणि ते कुत्र त्याला जोरात चावतो. असला भयंकर त्याला राग येतो १०-१२ दगड उचलून तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो पण त्या कुत्र्याला एकही दगड लागत नाही , ते जात पळून.
मग हा उद्योगपती रागा-रागात ऑफीस मध्ये जातो आणि सगळ्या म्यानेजर लोकांची मिटींग बोलावतो आणि त्या कुत्र्याचा राग त्यांच्यावर काढतो. मग म्यानेजर लोकं ही पिसाळतात उगाच काही कारण नसताना बॉस ने शिव्या घातल्या. मग ते म्यानेजर लोकं त्यांच्या खालच्या लोकांवर जाळ काढतात … मग अस करत करत ती सायकल पिऊन (नोकर) पर्यंत येते.
आता पिऊनच्या खाली कोणच नसते ना ऑफिस मधून मग तो जरा पिऊन घरी जातो. दार वाजवतो बायको दार उघडते … आणि विचारते …
एवढा का उशीर ?
तो देतो बायकोला एक कानाखाली .. आणि म्हणतो मी की गोट्या खेळतो का ऑफीस मध्ये ? … काम असतात मला …. डोक नको फिरवू… चल जेवायला वाढ.
आता बायको पिसाळते … काहीही केले नसताना कानाखाली खाल्ली … ती आपली किचन मध्ये जाते आणि पोरग आपलं मध्ये मध्ये येत असत म्हणून ती पोराला बदा-बदा मारती. तिने राग काढला पोरावर….
आता पोरग काय करणार ?
ते आपलं चाचपडत घरा बाहेर जात , एक दगड उचलत आणि पुढे एक कुत्र असते त्याला जोरात दगड मारत !!
मित्रानो तेच ते सकाळच कुत्र !!!
त्याला दगड लागणारच होता फ़क़्त उद्योगपती कडून न लागता त्या पोराकडून लागला. त्याचे सर्कल कंपलिट झाले.
त्यामुळे काळजी करू नका तुमाला कोणीही चावू दे, त्याला दगड लागणार….. नक्की लागणार.

No comments:

Post a Comment